मंत्रिमंडळ बैठकीत म्हादई विषयावरून माविन – विश्‍वजित यांच्यात खडाजंगी

0
164

गोवा विधानसभेचे खास अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत म्हादई या विषयावरून वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो आणि आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांच्यात काल जोरदार खडाजंगी झाली.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत म्हादईचा विषय लावून धरण्याचा सूर काही मंत्र्यांनी लावला. त्यावेळी वाहतूकमंत्री गुदिन्हो यांनी म्हादईच्या प्रश्‍नाला माजी मुख्यमंत्री तथा कॉंग्रेसचे आमदार प्रतापसिंह राणे जबाबदार आहेत. राणे हा म्हादईचा विषय योग्य प्रकारे हाताळू शकले नाहीत, असा आरोप केला. या वक्तव्यामुळे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे भडकले. त्यांनी मंत्री गुदिन्हो यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवून चांगलेच फैलावर घेतले.