मंगळुरात उद्या कॉंग्रेसच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन

0
151

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसचा जाहीरनामा कॉंग्रेसाध्यक्ष राहुल गांधी उद्या दि. २७ रोजी मंगळुर येथे प्रकाशित करणार आहेत.
राहुल गांधी या निवडणुकीच्या आपल्या मोहिमेस आजपासून पुन्हा प्रारंभ करणार आहेत. उत्तर कर्नाटकमधील भटकळ, अंकोला, कुमठा, होन्नावर येथे त्यांच्या छोट्या सभा होणार आहेत.

याच दरम्यान २७ रोजी मंगळूर येथे पक्षाचा निवडणूक जाहीरनामा राहुल गांधी प्रकाशित करतील असे सांगण्यात आले. आतापर्यंत दक्षिण कर्नाटकात राहुल गांधी यांनी प्रचाराच्या सहा फेर्‍या पूर्ण केल्या आहेत. कर्नाटक विधानसभेसाठी येत्या १२ मे रोजी मतदान होणार आहे. यावेळी कॉंग्रेस, भाजप व जेडीएस अशी तिरंगी लढत होणार आहे.