मंगळाच्या गुरुत्वाकर्षण प्रभाव क्षेत्रात मंगळयान

0
127

भारताचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेले मंगळयान काल मंगळ ग्रहाच्या गुरुत्वाकर्षण प्रभाव क्षेत्रात दाखल झाले. हे यान नियोजित कार्यक्रमानुसार प्रत्यक्ष मंगळ ग्रहाच्या कक्षेत दि. २४ रोजी प्रवेश करणार आहे. दरम्यान, काल भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्त्रो) मंगळयानाच्या मुख्य इंजीनची चाचणी केली ती यशस्वी ठरली. यान गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात अंतराळात सोडले होते. पृथ्वीच्या कक्षेतून ते १ डिसेंबरला बाहेर पडले. मंगळयान प्रकल्पामुळे भारत मंगळावर यान धाडणार्‍या प्रतिष्ठीत राष्ट्रांच्या पंक्तीत बसला आहे.