मंगळवारी राज्यात दोघांचा मृत्य

0
233

राज्यात काल मंगळवारी कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला असून कोरोनामुळे बळी गेलेल्यांची एकूण संख्या ७२५ झाली आहे. कोरोनाचा संसर्ग झालेले काल ९६ नवे रुग्ण सापडल्याने एकूण रुग्णसंख्या ५०,२३९ एवढी झाली आहे. सध्याच्या रुग्णांची संख्या ९४७ एवढी झाली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.६७ टक्के झाले आहे. तसेच काल राज्यात ८८ जण कोरोनामुक्त झाल्याने कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या ४८,५६७१ झाली असल्याची माहिती आरोग्य खात्याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे. काल खात्यातर्फे १८८८ जणांची स्वॅब चाचणी करण्यात आली.

राज्यात आतापर्यंत ३,८४,७४० एवढ्या लोकांची कोरोना संसर्गाची चाचणी करण्यात आलेली आहे. कोरोना संसर्ग झालेल्या १४,१२२ जणांनी राज्यातील इस्पितळात उपचार घेतले आहेत. तर २६,२७५ जणांनी घरी विलगीकरणात राहून उपचार घेतले आहेत.
दक्षिण गोव्यात मडगाव येथे सर्वाधिक १४६ रुग्ण असून केपे व फोंड्यात प्रत्येकी ५८ रुग्ण तर वास्कोत ५६ आहेत. उत्तर गोव्यातील पर्वरी व पणजीत प्रत्येकी ६४ रुग्ण उपचार घेत असून इतर ठिकाणी ५० पेक्षा कमी रुग्ण आहेत.

उत्तर गोव्यातील कोविड केअर सेंटरमध्ये सर्वच्या सर्व म्हणजे २७५ खाटा रिक्त झाल्या आहेत. तर दक्षिण गोव्यातील ६० पैकी २५ खाटा रिक्त असून तिथे ३५ जण उपचार घेत आहेत.
दरम्यान, काल कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या ९१ जणांनी घरी विलगीकरणाचा निर्णय घेतला. तर ४२ जणांनी इस्पितळात विलगीकरणात राहण्याचे ठरवले.