>> सक्रिय रुग्णसंख्या पाचशेच्या खाली
राज्यात गेल्या चोवीस तासांत ४ कोरोना रुग्णांच्या बळींची नोद झाली असून नवीन ३१ नवे बाधित रुग्ण आढळून आले आहेत. मागील कित्येक महिन्यांनी सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या पाचशेच्या कमी झाली आहे. राज्यात मागील दोन दिवस शून्य कोरोना रुग्णांच्या बळींची नोंद झाली होती. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ४८३ झाली आहे. राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ३३६२ एवढी आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यातून ५९ जण कोरनोामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८४ टक्के एवढे आहे. काल कोरोनामुक्त झाल्याने ३ जणांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. तसेच कोरनाची बाधा झाल्यामुळे ४ जणांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. तसेच काल २७ जणांनी घरी विलगीकरणात राहण्याचा पर्याय स्वीकारला आहे.