देशात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. मंकीपॉक्सचा धोका पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. देशात प्रवेशाच्या प्रत्येक ठिकाणी लक्षणे असलेल्या आणि लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी वैद्यकीय तपासणी पथके, डॉक्टर, चाचणी, ट्रेसिंग आणि पाळत ठेवणारी पथके तयार करावीत. तसेच, वैद्यकीय प्रोटोकॉलनुसार रुग्णालयात उपचार आणि क्लिनिकल व्यवस्थापनाची व्यवस्था असावी, असे सुचवले आहे.