भोमवासीयांनी केली बगलमार्गाची मागणी

0
4

भोमवासीयांच्या काल झालेल्या बैठकीत त्यांच्या गावातून सरकारने महामार्ग नेण्याचा निर्णय बदलावा व त्याऐवजी बगलमार्गाची सोय करावी अशी मागणी करण्यात आली. त्या संदर्भात सरकारने 15 दिवसांच्या मुदतीत योग्य काय तो निर्णय द्यावा अशी मागणीही या बैठकीत करण्यात आली. ही मुदत पुढील सात दिवसांत संपणार आहे. दि. 29 ऑक्टोबर रोजी पंचायतीची ग्रामसभा असून त्यात वरील मुद्द्यावर चर्चा होणार आहे. गावातून हा महामार्ग गेल्यास स्थानिकांची घरे, मंदिरे अन्य बांधकामे मोडावी लागणार असल्याने सरकारने आपला निर्णय बदलावा अशी मागणी यावेळी आहे.