भोमा गावातील लोकांच्या मागणीची दखल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतल्याने लोकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. ग्रामस्थांनी बगल रस्त्याच्या मागणीसाठी 8 जानेवारी रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना टपालाद्वारे समस्यापत्र पाठविले होते.
गेल्या दीड ते दोन वर्षांपासून भोमवासियांना राज्य सरकारकडून सहकार्य मिळत नसल्याने 8 जानेवारी रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना टपालातून सर्व माहिती पाठविण्यात आली होती. बगल रस्त्याची मागणी करणाऱ्या ग्रामस्थांना यापूर्वी पोलिसांनी सुद्धा अटक केली होती. नाराज झालेल्या लोकांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठवलेल्या पत्राचे सकारात्मक उत्तर मिळाले आहे. त्यामुळे भोम वासियांचा आनंद द्विगुणित झाला आहे.
पत्राचे सकारात्मक उत्तर
बगल रस्त्याची मागणी करीत आंदोलन करताना भोम येथील ग्रामस्थांना यापूर्वी पोलिसांनी अटक केली होती. या कारवाईने नाराज झालेल्या लोकांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठविले होते. त्या पत्राचे सकारात्मक उत्तर मिळाले आहे. त्यामुळे भोम वासियांचा आनंद द्विगुणित झाला आहे.