भेसळयुक्त माल प्रकरणी दोन बेकरींवर कारवाई

0
66

गोठणीचा व्हाळ करासवाडा व धुळेर म्हापसा येथे अन्न व औषध प्रशासन खात्याने दोन बेकरींवर छापा टाकून आरोग्यास अपायकारक असणारा फरसाण आणि भेसळयुक्त जिलेबी मिळून अंदाजे ५० हजार रुपयांचा माल जप्त केला व बेकरी मालकांवर गुन्हा दाखल केला.
अन्न व औषध प्रशासन खात्याचे वरिष्ठ अधिकारी राजीव कोरडे, अधिकारी क्लाविया डिसोझा यांनी प्रदीप पार्सेकर व अर्जुन नाईक या कर्मचार्‍यांसमवेत गोठणीचा व्हाळ – करासवाडा येथील नबी हुसेन यांच्या गोवा बेकरी धुळेर येथील छगनलाल प्रजापती यांच्या मालकीच्या सुंदर फुड्‌स ऍण्ड प्रोडक्ट या बेकर्‍यावर छापा टाकून कारवाई केली.