भूरुपांतरासाठी शुल्क निश्चित

0
6

नगर-नियोजन खात्याने प्रक्रमण संसाधन शुल्क तसेच ज्या लोकांना आपली जमीन ही निवासी विभाग म्हणून बदलून हवी आहे, त्यांच्यासाठी शुल्कासंबंधीचे नियम अधिसूचित केले आहेत. ज्या जमीन मालकांना आपली 500 चौरस मीटरपर्यंतची जमीन निवासी जमीन म्हणून बदलून हवी असेल, त्यांना त्यासाठीचे प्रक्रमण संसाधन शुल्क म्हणून 5 हजार रुपये भरावे लागणार आहेत. तसेच ज्यांची जमीन 500 चौरस मीटरपेक्षा जास्त असेल, त्यांच्यासाठी हे शुल्क 10 हजार रुपये एवढे असेल, असे अधिसूचित केलेल्या कायद्यातून स्पष्ट करण्यात आले आहे. ज्यांना आपली जमीन औद्योगिक विभाग म्हणून रुपांतरित करायची असेल त्यांना त्यासाठी प्रती चौरस मीटर 200 ते 500 रुपये एवढे शुल्क भरावे लागेल. किती जमीन रुपांतरित करायची आहे त्यानुसार हे दर ठरतील.