भूमी अभिलेख नोंदींचे होणार आधुनिकीकरण

0
3

केंद्र सरकारकडून शहरी जमिनीच्या भूमी अभिलेख नोंदींचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. देशातील 150 हून अधिक शहरांची भूमी अभिलेख नोंदणीच्या आधुनिकरणासाठी प्रायोगिक तत्त्वावर निवड करण्यात आली आहे. त्यात गोव्यातील पणजी महानगरपालिका, मडगाव आणि कुंकळ्ळी नगरपालिकेची निवड करण्यात आली आहे. डिजिटल इंडिया जमीन नोंदी आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत नॅशनल जिओ स्पेशल तंत्रज्ञानाचा वापर करून अभिलेख नोंदीचे आधुनिकीकरण केले जाणार आहे. देशपातळीवरील या उपक्रमाचा शुभारंभ मंगळवार दि. 18 फेब्रुवारीपासून केला जाणार आहे.