भूमाफिया सिद्दिकीसह पत्नीची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी

0
1

राज्यातील जमीन घोटाळा प्रकरणातील संशयित आरोपी सिद्दिकी ऊर्फ सुलेमान खान याची 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. याशिवाय त्याची पत्नी अफसाना हिची देखील काल न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. रायबंदर येथे गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलीस कोठडीतून पलायन प्रकरणी सिद्दिकीला जुने गोवे पोलिसांनी अटक केली होते. जुने गोवा पोलिसांनी त्याला येथील प्रथम श्रेणी न्यायालयात हजर काल केले. त्यानंतर न्यायालयाने त्याची 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. गुन्हा अन्वेषण विभागाने एर्नाकुलम केरळ येथे सिद्दिकी खान आणि त्याची पत्नी अफसाना ऊर्फ सारिका खान हिला ताब्यात घेतले होते. एका प्रकरणामध्ये अफसाना हिला अटक करून चार दिवसांची कोठडी घेण्यात आली होती. ही कोठडी संपल्यानंतर काल तिला म्हापसा येथील प्रथम श्रेणी न्यायालयात हजर करण्यात आले आणि त्यानंतर तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.