भूतानीला दिलेले परवाने मागे घ्या : युरी आलेमाव

0
3

भूतानी मेगा प्रकल्पाशी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा संबंध नसल्यास, ज्यांचा आहे, त्या संबंधितांची नावे जाहीर करण्याचे आव्हान विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी त्यांना काल दिले. तसेच भूतानी इन्फ्रा कंपनीला दिलेले परवाने मागे घ्यावेत, अशी मागणी आलेमाव यांनी केली. प्रमोद सावंत हे गोव्याचे मुख्यमंत्री आहेत, ते काही सामान्य माणूस नाही. आपल्या खात्यात आणि सरकारमध्ये काय चालले आहे, याची त्यांना माहिती नसेल तर त्यांना त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही. भूतानीशी त्यांचा संबंध नसेल, तर त्यांच्याशी कोण जोडले गेले आहे, हे त्यांनी सांगावे, असेही आलेमाव म्हणाले.