भुवी, कुलदीपचे पुनरागमन

0
88

वेस्ट इंडीजविरुद्धच्या ती टी-ट्वेंटी व तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघात भुवनेश्‍वर कुमार व कुलदीप यादव यांचे पुनरागमन झाले आहे. बांगलादेशविरुद्धच्या टी-ट्वेंटी मालिकेसाठी विश्रांती दिलेला कर्णधार विराट कोहलीदेखील संघात परतला आहे. २०१७ साली आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटी सामना खेळलेला मोहम्मद शमीला संघात घेताना खलील अहमद व शार्दुल ठाकूर यांना वगळण्यात आले आहे. कृणाल पंड्याची जागा रवींद्र जडेजाने घेतली आहे. बांगलादेशविरुद्धच्या टी-ट्वेंटीत मालिकेत एकही सामन्यात न खेळलेल्या संजू सॅमसन व राहुल चहर यांनादेखील डच्चू देण्यात आला आहे. शिवम दुबे याला दोन्ही संघात स्थान मिळाले आहे. ६, ८ व ११ डिसेंबर रोजी टी-ट्वेंटी तर १५, १८ व २२ रोजी वनडे सामने होणार आहेत.

टी-ट्वेंटी संघ ः विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चहर, मोहम्मद शमी व भुवनेश्‍वर कुमार
वनडे संघ ः विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, शिवम दुबे, केदार जाधव, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चहर, मोहम्मद शमी व भुवनेश्‍वर कुमार.