भीम आर्मीचे आझाद पोलिसांच्या ताब्यात

0
107

भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना काल हैदराबाद पोलिसांनी ताब्यात घेतले. येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस संस्थेच्या विद्यार्थ्यांसमोर भाषण देण्यासाठी आल्यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांना केवळ खबरदारी म्हणून ताब्यात घेतल्याचे हैदराबादचे पोलिस आयुक्त यांनी सांगितले. मात्र आझाद यांच्या ट्विटरवर त्यांना अटक केल्याचे म्हटले आहे. वरील संस्थेच्या विद्यार्थ्यांनी सीएए, एनआरसी व एनपीसी यांना विरोध दर्शविण्यासाठी सभेचे आयोजन केले होते.