भीमा-कोरेगाव हिंसाचार; गोन्साल्वीस, फरेरांना जामीन

0
24

भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील संशयित व्हर्नन गोन्साल्वीस आणि अरुण फरेरा यांना सर्वोच्च न्यायालयाने काल जामीन मंजूर केला. व्हर्नन गोन्साल्वीस आणि अरुण फरेरा हे 2018 पासून तुरुंगात आहेत आणि मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर जामिनासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणात दोघांवरही गंभीर आरोप आहेत; पण ते पाच वर्षांपासून कोठडीत आहेत. त्यामुळेच त्यांना जामीन मंजूर करण्यात येत आहे. त्यांना काही अटी-शर्थींसह जामीन मंजूर करण्यात आला असून, या दोघांचे पासपोर्ट जप्त करण्यात येणार आहेत. तसेच त्यांनी एनआयए अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहावे, असे सर्वोच्च न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.