केंद्र सरकारने ५४ हून अधिक चिनी ऍप्सवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. या ऍप्सपासून भारतीयांच्या गोपनीयतेला आणि सुरक्षिततेला धोका आहे, असे हा निर्णय जारी करताना अधिकार्यांनी सांगितले. बंदी घालण्यात आलेल्या यापैकी बरेच ऍप्स मोठ्या चिनी तंत्रज्ञान कंपन्यांची आहेत आणि २०२० पासून भारतात बंदी घालण्यात आलेल्या ऍप्सचे नामांतर केलेले किंवा दुसर्या ब्रँडच्या नावाखाली नव्याने लॉंच केलेले आहेत. गुगलच्या प्ले स्टोअरसह टॉप ऍप स्टोअरनाही हे ऍप्लिकेशन ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत.