भारत-बांगलादेश सीमेवर शेतकऱ्यांमध्ये वादविवाद

0
0

भारतीय आणि बांगलादेशच्या सीमेवर दोन्ही देशांच्या शेतकऱ्यांमध्ये वाद झाला आहे. या वादानंतर भारत आणि बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. भारतीय शेतकऱ्यांनी बांगलादेशी शेतकऱ्यांवर सीमेपलीकडून पीक चोरीचा आरोप केला आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये वाद सुरू झाला आहे. दोन्ही देशांतील शेतकऱ्यांची संख्या वाढू लागली. यावेळी दगडफेकदेखील झाली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. या घटनेची माहिती मिळताच बीएसएफ (भारतीय सीमा सुरक्षा दल) आणि बीजीबी (बांगलादेश बॉर्डर गार्ड) तात्काळ घटनास्थळी पोहोचले व त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. दोन्ही सुरक्षा दलांनी आपापल्या देशातील शेतकऱ्यांना पांगवले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र, भारतीय शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. कारण बांगलादेशच्या शेतकऱ्यांनी भारतीय शेतकऱ्यांची पिके चोरल्याचा आरोप आहे. मात्र, या घटनेनंतर भारताच्या सीमेच्या 50 ते 75 मीटर आत काही बांगलादेशी नागरिक दिसले होते. त्यांना बीजीबीने हटवले आहे.