श्रीलंकेवर सोमवारी ६ विकेट्सनी विजय मिळवित गुणतक्त्यात अव्वल स्थान मिळविलेल्या टीम इंडियाची आज बुधवारी निदाहास चषक तिरंगी स्पर्धेत बांगलादेेशविरुद्ध लढत होणार आहेे. या सामन्यात बांगलादेशवर विजय मिळवित भारतीय संघ अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित करण्याच्या इराद्यानेच मैदानावर उतरणार आहे.
दोन्ही संघांचा विचार केल्यास भारतीय संघ मजबूत दिसून येत आहे. परंतु बांगलादेशी संघालाही कमी लेखून चालणार नाही. त्यांनी श्रीलंकेवर मोठा विजय मिळविलेला आहे.
भारतीय कर्णधार रोहित शर्माने गमावलेली लय ही चिंतेचा विषय बनला आहे. त्याला लय मिळाली तर तो बांगलादेशी गोलंदाजांवर निश्चितच वर्षस्व गाजवेल. शिखर धवन आणि सुरेश रैना या दोन डावखुर्या फलंदाजांना भारताला मोठी धावसंख्या उभारून देण्यात मोलाची भूमिका बजवावी लागेल. मध्यफळीत मनीष पांडे चांगली कामगिरी करीत आहे. हार्दिक पंड्याच्या जागी अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात स्थान मिळविलेला विजय शंकरनेही चांगल्या खेळाची प्रदर्शन केलेले आहे.
गोलंदाजीचा विचार केल्यास द्रुतगती गोलंदाज शार्दुल ठाकुरने श्रीलंकेविरुद्ध खेळविण्यात आलेल्या सामन्यात ४ बळी मिळविले आहेत. दिनेेश कार्तिकमुळे ऋषभ पंतला आजच्याही सामन्या राखीव खेळाडूंतच बसावे लागेल.
जर आजच्या सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागल्यास टीम इंडियाला श्रीलंका व बांगलादेशविरुद्ध होणार्या सामन्यातील निकालावर अवलंबून रहावे लागणार आहे. गेल्या लढतीत श्रीलंकेकडून मिळालेले २१५ धावांचे लक्ष्य गाठल्यानंतर बांगलादेशी संघाचा आत्मविश्वास दुणावलेला असेल.
संभाव्य संघ ः भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), लोकेश राहुल, सुरेश रैना, मनीष पांडे, दिनेश कार्तिक (यष्टिरक्षक), दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, विजय शंकर, शार्दुल ठाकुर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज आीण ऋषभ पंत. बांगलाादेश : महमुदुल्लाह (कर्णधार), तमीम इक्बाल, सौम्य सरकार, इमरुल कायेस, मुश्फिकुर रहीम (यष्टिरक्षक), सब्बीर रहमान, मुस्तफिझुर रहमान, रुबेल हुसेन, तस्किन अहमद, अबु हैदर, अबु जायेदस अरिफुल हक, नजमुल इस्लाम, नुरुल हसन, मेहदी हसन आणि लिटन दास.