जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. त्यानंतर भारत व पाकिस्तानच्या सैनिकांदरम्यान, बराचवेळ गोळीबार झाला.लष्कर प्रवक्त्याच्या माहितीनुसार राजौरी जिल्ह्याच्या हमीरपूर भागात पाकिस्तानी लष्कराने भारताच्या बाजूने बेधुंद गोळीबार सुरू केला. काल सकाळी ८.३० वा. सुरू केलेल्या या गोळीबारास भारतानेही चोख प्रत्यूत्तर दिले. दुसर्या एका घटनेत पाकिस्तानी रेंजर्सनी आर.एस.पुरा भागात आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमा सुरक्षा दलावर गोळीबार केला. दरम्यान, नियंत्रण रेषेवर लष्कर तर आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमा सुरक्षा दल पहारा देते.