पाकिस्तानकडून शस्त्रसंबंधी उल्लंघनाच्या सततच्या प्रकारांनंतर काल वाघा आंतरराष्ट्रीय सीमेवरील सीमा सुरक्षा दल व पाकिस्तान रेंजर्स यांच्या अधिकार्यांची बैठक झाली. या ध्वजाधिकारी बैठकीत उभय देशांदरम्यान चर्चा चालू ठेवावी असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बीएसएफचे महानिरीक्षक राकेश शर्मा यांनी दिली. जम्मू काश्मीरच्या अखतूर क्षेत्रातील निकोवल सीमा चौकीवर ही बैठक झाली.