सार्क परिषदेदरम्यान, भारत व पाकिस्तान यांच्यात बंद झालेली चर्चा सुरू व्हावी यासाठी मध्यस्थी करण्यास नेपाळ तयार असल्याचे, नेपाळचे विदेश मंत्री महेंद्र पांडे यांनी सांगितले. सार्क परिषद दि. २६ व दि. २७ रोजी काठमांडू येथे होत आहे. दोन्ही देशांचे पंतप्रधान संबंध सुधारांसाठी इच्छुक आहेत, त्यासाठी पुढाकार घेण्यास नेपाळला नक्कीच आवडेल, असे पांडे म्हणाले. दरम्यान, दुसरीकडे मोदी-शरीफ यांच्या भेटीबाबत विचारले असता भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ‘एक दिवस थांबा’ असे उत्तर दिले.