>>आयसीसीची कबुली
चॅम्पियन्स चषक स्पर्धेच्या यशासाठी भारत आणि पाकिस्तान यांचा जाणुन-बजून एकाच गटात समवेश करण्यात आल्याची कबुली आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) दिली आहे. पुढील वर्षी इंग्लंडमध्ये होणार्या चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा गट फेरीत आमने-सामने ठाकणार आहेत. आयसीसीचे सीईओ डेव्ह रिचर्डसन यांनी या संदर्भात महिती देताना यात कोणतीही शंका नाही की आम्ही आमच्या स्पर्धांत भारत आणि पाकिस्तान यांचा एकाच गटात समावेश करण्याचा प्रयत्न करतो, असे स्पष्ट केले. आयसीसीच्या दृष्टीने ते बरेच महत्त्वपूर्ण आहे, असे रिचर्डसन म्हणाले. जगभरातील क्रिकेटप्रेमीं या लढतीची वाट पाहत असतात, असे स्पष्ट करतानाच त्यांनी या चीर प्रतिस्पर्ध्यांमध्ये सातत्याने होणार्या लढतींमुळे त्यांना आयसीसी स्पर्धांच्या निःपक्षतेवर कोणताही परिणाम होत नसल्याचेही सांगितले.
आयसीसीकडून खुलासा
भारत आणि पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये असावे यासाठी जाणूनबुजून कोणतेही प्रयत्न करण्यात आले नाहीत. ३० सप्टेंबर २०१५ साली आयसीसीच्या वनडेरॅकिंगमध्ये असलेल्या टॉप ८ टीमचा चॅम्पियन्स ट्रॉङ्गीमध्ये समावेश करण्यात आला, असे आयसीसीने सांगितलं आहे. चॅम्पियन्स ट्रॉङ्गीतले दोन्ही ग्रुप तुल्यबळ करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.
भारत-पाकिस्तानमधल्या सामन्यांमुळे आयसीसीला मोठ्या प्रमाणावर पैसे मिळतात, म्हणून आयसीसी ग्रुपमधल्या टीम ङ्गिक्स करते असा निष्कर्ष रिचर्डसन यांच्या वक्तव्यानं काढला गेला होता. या मुद्द्यावर आता खुद्द आयसीसीलाच स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे.