भारत न्याय यात्रेच्या नावात पुन्हा बदल

0
11

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी गेल्या वर्षी कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा पूर्ण केली. राहुल गांधी आता दुसऱ्या टप्प्यातील यात्रा सुरू करणार आहेत. मणिपूर ते मुंबई अशी ही पदयात्रा असणार आहे. भारत जोडो यात्रा नाव बदलून पहिल्यांदा त्याला ‘भारत न्याय यात्रा’ असे नाव देण्यात आले होते. काल पुन्हा एकदा या यात्रेच्या नावात थोडा बदल करण्यात आला. या पदयात्रेला ‘भारत जोडो न्याय यात्रा’ असे नाव देण्यात आले आहे. काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी काल पत्रकार परिषद ही माहिती दिली.

ही यात्रा 14 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता मणिपूरची राजधानी इम्फाळमधून सुरू होईल. या यात्रेदरम्यान, राहुल गांधी तब्बल 67 दिवस 6,713 किलोमीटर प्रवास करतील. 15 राज्यांच्या 110 जिल्ह्यांमधून ही यात्रा जाईल. या यात्रेत तब्बल 100 लोकसभा मतदारसंघांना ते भेट देतील. त्यानंतर ही यात्रा मुंबईत समाप्त होईल. याआधीच्या भारत जोडो यात्रेत पाच महिन्यांच्या कालावधीत राहुल गांधी यांनी एकूण 12 राज्यांमधील 75 जिल्ह्यांतून 3700 किलोमीटरचा प्रवास केला होता.