भारत-नेपाळमध्ये विविध करार

0
128

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नेपाळला उच्च तंत्रज्ञानयुक्त हेलिकॉप्टर भेट दिले. आजपासून सुरू होत असलेल्या सार्क परिषदेसाठी पंतप्रधान मोदी काल काठमांडूत दाखल झाले. यावेळी भारत-नेपाळमध्ये विविध १२ करार झाले. यात काठमांडू-वाराणसी, जनकपुरी – अयोध्या, लुंबिनी-बोधगया यांना ‘भगिनी शहरे’ म्हणून विकसित करण्याच्या करारावर स्वाक्षरी झाली. शिवाय वाराणसी व पशुपतीनाथ या दोन स्थळांना जोडणार्‍या बससेेवेचा शुभारंभ झाला. नेपाळमध्ये शेतीस प्रोत्साहनाच्या हेतूने भारताकडून एक फिरती मातीची तपासणी करणारी प्रयोगशाळाही भेट दिली. दरम्यान, नेपाळने लवकरात लवकर आपले संविधान लिहून पूर्ण करावे, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी नेपाळला केले.