भारत व चीनदरम्यान, लडाखमध्ये गेल्या तीन आठवड्यांपासून असलेला सीमाविषयक तणाव अखेर काल निवळला. दोन्ही बाजूंनी वाद मिटल्याचे घोषित करण्यात आले. पुढील महिन्यात दोन्ही बाजूंच्या अधिकार्यांची सीमाविषयक बोलणीही होणार आहेत. लडाखच्या छुमेर भागात तणावामुळे दोन्ही देशांनी आपापले सैनिक वाढवले होते.