भारत-चीन अनौपचारीक बैठकांची परंपरा व्हावी : मोदी

0
135

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल चीनचे अध्यक्ष शी जीनपिंग यांची अनौपचारीक भेट घेऊन चर्चा केली. उभय देशांदरम्यान अशा अनौपचारीक बैठकांची परंपरा निर्माण व्हायला हवी अशी प्रतिक्रिया मोदी यांनी जीनपिंग यांची भेट घेतल्यानंतर व्यक्त केली. तसेच २०१९मध्ये अशा प्रकारची बैठक भारतात झालेली आपल्याला आवडेल असेही मोदी यावेळी म्हणाले.
शी जीनपिंग यांनी चीनच्या राजधानीबाहेर भारताच्या पंतप्रधानांचे दोन वेळा स्वागत केल्याचा भारतीय जनतेला अभिमान असल्याचा उल्लेख या भेटीवेळी मोदी यांनी केली.

या अनौपचारीक बैठकीसाठी मोदी यांचे काल सकाळी या शहरात आगमन झाले. जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी ४० टक्के लोकांसाठी काम करण्याची भारत व चीन यांच्यावर जबाबदारी आहे याकडे मोदी यांनी यावेळी लक्ष वेधले. डोकलाम प्रकरणी गेल्यावर्षी सुमारे ७३ दिवस निर्माण झालेल्या गंभीर स्थितीनंतर उभय देशांमधील संबंध सुधारून विश्‍वासार्हता निर्माण करण्याचा प्रयत्न म्हणून या अनौपचारीक बैठकीकडे पाहिले जात आहे. भारत-चीनसंबंधांना २००० वर्षांचा इतिहास असून उभय देशांनी जागतिक अर्थ व्यवस्थेला १६०० वर्षे चालना दिल्याचेही मोदी म्हणाले.