भारत – ऑस्ट्रेलियात नागरी अणू करार

0
78

भारत – ऑस्टेलिया दरम्यान, दीर्घकाळ प्रतीक्षेतील शांततापूर्ण उपयोगासाठी अणू ऊर्जा सहकार्याच्या करारावर स्वाक्षरी झाली. भारतभेटीवर असलेले ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अबोट व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात अंतिम बोलणी झाल्यानंतर करारास मान्यता देण्यात आली. यूरेनियम पुरवठा, रेडिओ आयझोटोप्सचे उत्पादन, अणू सुरक्षा व इतर संबंधित सहकार्याचे करारात मुद्दे आहेत. करारासाठी चर्चेची सुरूवात २०१२ साली झाली होती.