भारत-अमेरिकेची  दाऊदसाठी संयुक्त रणनीती

0
76

अंडलवल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या डी-कंपनीची आर्थिक कोंडी करणे तसेच त्याला मिळणारे तांत्रिक सहाय्य रोखणे यासाठी भारत व अमेरिकेने संयुक्तपणे रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. पंतप्रधानांसोबत गेलेले भारताचे सुरक्षा सल्लागार अजित दोवल हे अमेरिकेतच थांबले असून तेथील अधिकार्‍यांसबोत दाऊदसंबंधी योजना आखत आहेत. मोदी व ओबामा यांनी अमेरिकेत संयुक्त वक्तव्यात दहशतवादाचा प्रसारकर्ते अल कायदा, लष्कर ए तोयबा, जैश मोहम्मद, डी-कंपनी यांचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी संयुक्तपणे वावरणार असल्याचे म्हटले होतेे.