कॅनडातील एडमोंटन येथे सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या 20 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पंजाब राज्यातील हर्षनदीप सिंग असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली असून पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे. हर्षदीप हा पंजाबमधील कोणत्या गावाचा किंवा शहराचा आहे हे अद्याप कळू शकलेले नाही. हर्षदीप ज्या अपार्टमेंटमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून तैनात होता, त्या अपार्टमेंटच्या बाहेर काही लोकांमध्ये हाणामारी झाल्याचे कळते. काही लोक अपार्टमेंटमध्ये घुसले त्यानंतर गोळीबाराची घटना घडली. प्राथमिक तपासात दोन संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सीसीटीव्हीतही कैद झाली आहे. सीसीटीव्हीमध्ये हल्लेखोर पीडितेला पायऱ्यांवरून खाली फेकताना दिसत आहे. या प्रकरणात दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे.