भारतीय वायूदलाच्या ताफ्यात पहिले राफेल विमान दाखल

0
134

भारतीय वायूदलाच्या ताफ्यात फ्रान्सकडून मिळालेले पहिले राफेल विमान दाखल झाले आहे. राङ्गेल बनवणारी कंपनी दसॉ एविएशनकडून पहिले राङ्गेल स्वीकारण्यात आल्याची माहिती भारतीय वायूदलातील सूत्रांनी दिली. राङ्गेल करारात घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांनी मोदी सरकारवर केला होता. त्यामुळे राङ्गेलचा मुद्दा देशभर गाजला होता.

डेप्युटी एअर ङ्गोर्सचे चीङ्ग मार्शल व्ही. आर. चौधरी यांच्या उपस्थितीत राङ्गेल विमान स्वीकारण्यात आले. श्री. चौधरी यांनी राङ्गेल विमान स्वीकारल्यानंतर त्याची चाचणी म्हणून ते तासभर उडवले. मिटीओर क्षेपणास्त्राने अत्याधुनिक असलेल्या राङ्गेलची मारक क्षमता पाकिस्तानच्या लढाऊ विमानापेक्षा अधिक आहे. चाचणीनंतर राङ्गेल वायुदलाच्या बेसमध्ये आणण्यात येईल.