भारतीय युवकांना दहशतवादाचे आकर्षण चिंताजनक : राजनाथ

0
86

भारतीय युवक ‘आयएसआयएस’सारख्या दहशतवादी संघटनांकडे आकर्षित होत असतील, तर ती चिंतेची बाब असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी काल म्हटले. ते येथे डीजीपी व आयजीपींच्या बैठकीला संबोधित करत होते. पाकिस्तान पुरस्कृत घटक भारतात अस्थैर्य माजवण्याच्या प्रयत्नात असल्याचे ते म्हणाले.सिरीया-इराकमध्ये वाढत असलेल्या ‘इस्लामिक स्टेट’ दहशतवादी संघटनेशी संबंध आल्याचा संशय असलेला मुंबईचा आरिफ माजिद या युवकासंदर्भात ते बोलत होते. आरिफला झालेली अटक ही प्रक्रियेचा भाग आहे, त्यात छळणुकीचा उद्देश नसल्याचे ते म्हणाले.
ते म्हणाले की, अल कायदाने – कायदा ऊल जेहाद – या विभागाची घोषणा केली आहे. बांगलादेश, आसाम, गुजरात, जम्मू काश्मीर आणि देशातील इतर भागांत जाळे पसरविण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. पण त्यांचा उद्देश कदापि पूर्ण होऊ दिला जाणार नाही, असे ते म्हणाले.