>> बहरीन संघाची खेळाडू उत्तेजक चाचणीत दोषी
जकार्ता येथे २०१८साली पार पडलेल्या आशिया खेळांतील ४४०० रिलेमध्ये जकार्ताला मिळालेले सुवर्णपदक धावपटू केमी अदेकोया उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळल्याने काढून घेण्यात आले. त्यामुळे आता रौप्यपदक विजेत्या भारतीय संघाला सुवर्णपदकाचा मान मिळणार आहे. ऍथलेटिक्स इंटिग्रीटी युनिट्ने बहरीनच्या संघावर कारवाई करीत भारताला हे सुवर्णपदक बहाल केले. २०१८च्या आशियाई खेळांत रौप्यपदक मिळविलेल्या भारतीय संघात मोहम्मद अनास, एम.आर.पवम्मा, हिमा दास आणि आरोकिया राजीव यांचा समावेश होता.
दरम्यान, भारताच्या अनु राघवन हिलाही कांस्यपदकाचा मान मिळणार आहे. चौथ्या महिलांच्या ४०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत तिने चौथे स्थान मिळविले होते. केमी अदेकोयावर उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळल्याने चार वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.
भारताच्या पदकांत बदल झाल्याने २०१८ जकार्ता आशियाई खेळांतील भारताची पदक संख्या २०वर पोहोचली आहे. त्यात ८ सुवर्ण व ९ रौप्यपदकांचा समावेश आहे.