भारतीय महिला संघाची घोषणा

0
118

>> टी-ट्वेंटी क्रिकेट विश्‍वचषक

ऑस्ट्रेलियात २१ फेब्रुवारीपासून खेळविल्या जाणार्‍या महिलांच्या टी-ट्वेंटी विश्‍वचषकासाठी बंगालची नवोदित फलंदाज रिचा घोष हिची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. हरियाणाच्या १५ वर्षीय शफाली वर्मा हिला सातत्यपूर्ण कामगिरीचे फळ मिळाले असून तीन आपला पहिलाच विश्‍वचषक खेळणार आहे. रिचा हिने महिला चॅलेंजर ट्रॉफी स्पर्धेतील एका सामन्यात २६ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ३६ धावांची खेळी केली होती. यापूर्वी वनडे क्रिकेटमध्ये खेळणारे चेहरेच टी-ट्वेंटी मध्ये दिसायचे. परंतु, २०१७च्या विश्‍वचषकानंतर संपूर्ण चित्र बदलले आहे.

मागील वर्षभरात तर पाच-सहा खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे. या खेळाडूंना प्रोत्साहन, पाठबळ देऊन त्यांना अधिकाधिक संधी देण्याची जबाबदारी निवड समितीची असल्याचे महिला निवड समितीच्या अध्यक्ष हेमलता काला यांनी संघ निवडीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. विश्‍वचषक स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियात होणार्‍या तिरंगी मालिकेसाठीदेखील संघाची घोषणा करण्यात आली असून या संघात नुझहत परवीन ही सोळावी खेळाडू असेल. ३१ जानेवारीपासून ही मालिका सुरु होणार असून इंग्लंड हा स्पर्धेतील तिसरा संघ असेल.

भारतीय महिला संघ ः हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिगीस, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, वेदा कृष्णमूर्ती, रिचा घोष, तानिया भाटिया, पूनम यादव, राधा यादव, राजेेश्‍वरी गायकवाड, शिखा पांडे, पूजा वस्राकर व अरुंधती रेड्डी.