भारतीय टेबल टेनिस संघांचे वर्चस्व

0
114
India's Madhurika Patkar (L) serves as teammate Mouma Das (R) looks on during their women's doubles table tennis match at the 2018 Gold Coast Commonwealth Games on April 5, 2018. / AFP PHOTO / William WEST

भारताच्या महिला व पुरुष टेबल टेनिस संघांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा कालचा पहिला दिवस गाजवला. महिला संघाने सर्वप्रथम श्रीलंकेवर ३-० असा व यानंतर वेल्सवर ३-१ असा विजय मिळविला. पुरुष संघाने त्रिनिदाद अँड टोबेगोला ३-० अशी धूळ चारली व यानंतर नॉर्दन आयर्लंडवर याच फरकाने विजय प्राप्त केला.

मनिका बात्राला एकेरीच्या पहिल्या लढतीत विजयासाठी अधिक मेहनत घ्यावी लागली नाही. तिने इरांदी वारुसाविताना हिला ११-३, ११-५, ११-३ असा सहज धक्का दिला. सुतिर्था मुखर्जीने यानंतर मनिकाचा कित्ता गिरवताना इशारा मनिक्कू बादू हिला ११-५, ११-८, ११-४ अशा फरकाने पराजित केले. सुतिर्थाने यानंतर पूजा सहस्रबुद्धे हिच्यासह दुहेरीत उतरताना हंसनी कापुगेकियाना व इशारा मनिक्कू बादू जोडीला ११-६, ११-७, ११-३ असे काही मिनिटांत नमविले. गटफेरीतील आपल्या दुसर्‍या लढतीत भारताने वेल्सवर ३-१ असा विजय साकारला. दुहेरीच्या लढतीत मौमा दास व मधुरिका पाटकर यांना ११ वर्षीय ऍना हर्सी व शार्लट केरी यांच्याकडून ८-११, ५-११, ११-५, ११-७, ११-१३ असा पराभव स्वीकारावा लागला.

लढतीतील हा तिसरा सामना होता. तत्पूर्वी, पहिल्या सामन्यात मनिकाने शार्लट केरी हिला ११-८, ८-११, ११-५, ११-४ असे व मौमा दासने क्लो थॉमसला १२-१०, ११-७, ११-७ असे पराजित करत भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली होती. मधुरिका पाटकरने यानंतर एकेरीच्या चौथ्या लढतीत क्लो थॉमसला ११-३, ११-४, १२-१० असे नमवून वेल्सला पुनरागमनाची संधी दिली नाही.

पुरुष संघाचा निकाल ः सामना क्र १. वि. त्रिनिदाद अँड टोबेगो (३-०) ः अँथनी अमलराज वि. वि. डेक्स्टर सेंट लुईस ११-५, ३-११,११-२, १४-१२, जी. साथियान वि. वि. ऍरोन विल्सन ११-५, ११-५, ११-४, जी. साथियान व हरमीत देसाई वि. वि. ऍरोन विल्सन व युवराज डोक्राम ११-९, ११-४, ११-४, सामना क्र. २ वि. नॉर्दन आयर्लंड (३-०) ः जी. साथियान वि. वि. ऍश्‍ले रॉबिनसन ११-४, ११-६, ११-४, शरथ कमल वि. वि. पॉल मॅक्रिरी ११-६, ११-८, ११-४, जी. साथियान व हरमीत देसाई वि. वि. झॅक विल्सन व पॉल मॅक्रिरी ११-२, ९-११, ११-५, ११-७