भारताला एकूण २१ पदके

0
105

सौरभ चौधरी व मनू भाकर यांनी जपानमधील वाको सिटी येथे काल संपलेल्या १०व्या आशियाई एअरगन अजिंक्यपद स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पदक जिंकत पुढील वर्षी होणार्‍या युथ ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी ‘कोटा’ मिळविला.
चौधरीने वैयक्तिक तसेच सांघिक १० मीटर एअर पिस्तोल युथ प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. तर भाकरने महिलांच्या १० मीटक एअर पिस्तोल युथ प्रकारात रौप्य जिंकले.
भारताने काल एकूण चार पदके पटकावत २१ पदकांसह स्पर्धेची सांगता केली. यात ६ सुवर्ण, ८ रौप्य व ७ कांस्यपदकांचा समावेश आहे. या पदकांसह युथ ऑलिम्पिकसाठीच्या एकूण चार जागा भारताने मिळविल्या.