पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल येथे आयोजित जागतिक उद्योजक परिषदेत भारताला सर्वात उद्योगप्रिय, पारदर्शक तसेच स्थिर करप्रणालीचा देश बनविण्याची ग्वाही जगभरातील उद्योजकांना दिली. आर्थिक वाढ व रोजगार निर्मितीच्या अनुषंगाने केंद्र तसेच राज्य पातळीवर एक खिडकी योजना यांची अमलबजावणी करण्यात येत आहे याकडेही मोदी यांनी यावेळी लक्ष वेधले. भारतात सहजतेने व्यवसाय करणे उद्योजकांना शक्य व्हावे यासाठी आपले सर्वतोपरी प्रयत्न असतील असे आपण वचन देत असल्याचे त्यांनी सांगितले.