दक्षिण आफ्रिका दौर्याचा शेवट गोड करताना भारताने अखेरच्या टी-२० सामन्यात विजय मिळवत मालिका २-१ अशी जिंकली. शनिवारी झालेल्या निर्णायक सामन्यात भारताने आफ्रिकेवर ७ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. भारताने दिलेल्या १७३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेचा संघ २० षटकात ६ बाद १६५ धावा करू शकला. सुरेश रैना सामनावीर तर भुवनेश्वर कुमार मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
धावफलक
भारत ः २० षटकांत ७ बाद १७२
द. आफ्रिका ः रिझा हेंड्रिक्स झे. धवन गो. कुमार ७, डेव्हिड मिलर झे. पटेल गो. रैना २४, जेपी ड्युमिनी झे. शर्मा गो. ठाकूर ५५, हेन्रिक क्लासेन झे. कुमार गो. पंड्या ७, ख्रिस्टियन जोंकर झे. शर्मा गो. कुमार ४९, ख्रिस मॉरिस त्रि. गो. बुमराह ४, फरहान बेहार्दिन नाबाद १५, अवांतर ४, एकूण २० षटकांत ६ बाद १६५
गोलंदाजी ः भुवनेश्वर कुमार ४-०-२४-२, जसप्रीत बुमराह ४-०-३९-१, शार्दुल ठाकूर ४-०-३५-१, हार्दिक पंड्या ४-०-२२-१, सुरेश रैना ३-०-२७-१, अक्षर पटेल १-०-१६-०