भारताने चीनला गोलशून्य रोखले

0
61

सुझोऊ (चीन)
सुझोऊ ऑलिम्पिक स्टेडियमवर झालेल्या ऐतिहासिक मैत्रीपूर्ण फुटबॉल लढतीत भारतीय संघाने चीनला गोलशून्य बरोबरीत रोखण्यात यश मिळविले. तब्बल २१ वर्षांनंतर दोन्ही संघ आमनेसामने ठाकले होते. पुढच्यावर्षी जानेवारी महिन्यात होत असलेल्या आशिया चषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीसाठी भारतीय संघासाठी हा महत्त्वाचा सामना होता. भारतानेही चाहत्यांची निराशा न करता तोडीस तोड खेळ करून चीनला चोख प्रत्युत्तर दिले.