भारतात सापडला मंकीपॉक्सचा रुग्ण

0
5

मंकीपॉक्स आजाराची रुग्णसंख्या वाढत असल्याने जगभरात चिंता व्यक्त केली जात असून, आता भारतातही संशयित मंकीपॉक्स रुग्णाची नोंद झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या संदर्भातील माहिती दिली असून, या रुग्णाला विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. संशयित रुग्णाला रुग्णालयात दाखल करून विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. मंकीपॉक्सच्या आजाराची स्थिती जाणून घेण्यासाठी त्याच्या रक्ताच्या नमुन्यांची चाचणी केली जात आहे. मंकीपॉक्सचे विषाणू असलेल्या देशातून त्याने प्रवास केल्याने हा संशय बळावला आहे. आफ्रिकन देशांत एमपॉक्स म्हणजेच मंकीपॉक्सची साथ वाढत असल्याने जागतिक आरोग्य संघटनेने या साथीला जागतिक स्वास्थ्य आणीबाणी घोषित केले आहे. एमपॉक्स हा प्रामुख्याने मध्य आणि पश्चिम आफ्रिकेत आढळणारा साथीचा आजार आहे. हा आजार देवीच्या रोगासारखा असतो, पण कमी संसर्गजन्य आहे.