>> वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांची माहिती
भारत पुढील वर्षी कोविड प्रतिबंधक लशींचे ५ अब्ज डोस तयार करण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी दिली. तसेच जगाला राहण्यासाठी एक सुरक्षित ठिकाण बनवण्यासाठी भारत आपले योगदान देणार आहे. लशींचा जगातील सर्वात मोठा उत्पादक असलेल्या भारताने इतर देशांना कोविड लशींचा पुरवठा पुन्हा सुरू केला आहे. भारतात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर या वर्षी एप्रिलमध्ये लशींची निर्यात थांबवण्यात आली होती.
मंत्री गोयल म्हणाले की, आपल्या देशातील लोकसंख्येचे लसीकरण करणे आणि उर्वरित जगाला लस पुरवणे या दोन्ही बाबतीत भारत सधअया पुढे आहे. आम्ही आधी निर्यात करत आलो आहोत, आता देखील निर्यात करत आहोत. आम्ही सर्वांसाठी लशी परवडणार्या किमतीत उपलब्ध करवून देण्यासाठी इतर देशांना आवश्यक तितक्या लशींचा पुरवठा करण्यास तयार असल्याचे गोयल यांनी यावेळी सांगितले.
सहा महिन्यांत येणार
मुलांसाठी लस ः पुनालावा
अद्याप भारतात लहान मुलांना देण्यासाठी कोणत्याही लशीला मान्यता मिळालेली नाही. देशभरात अनेक संस्था लहान मुलांना देता येईल, अशी कोरोना लस तयार करण्यासाठी संशोधन करत आहेत. आता पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अर्थात मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी यासंदर्भात मोठी घोषणा करताना आमची लस येत्या सहा महिन्यांत येईल असे सांगितले आहे.
अदर पूनावाला यांना सीआयआय अर्थात कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री या संस्थेकडून चर्चासत्रात आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी बोलताना पुनावाला यांनी लहान मुलांसाठी असलेली आमची कोवावॅक्स ही व्हॅक्सिन सध्या चाचणी स्तरावर आहे. पण तिच्या चाचण्यांचे अतिशय उत्तम निष्कर्ष दिसत असून लहान मुलांसाठीची आमची लस येत्या सहा महिन्यांत यईल असे सांगितले.