भारतात टीबीवरील लशीच्या चाचण्या सुरू असून २०२४ पर्यंत ही लस पूर्ण होण्याची शक्यता आहे. भारतातील सहा राज्यांमधील १८ ठिकाणी या लशीची चाचणी सुरू असून त्यात १२ हजारांहून अधिक स्वयंसेवकांचा समावेश आहे, असी माहिती आयसीएमआरअंतर्गत येणार्या नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट पुणे यांनी दिली. १२ हजारांहून अधिक लोकांनी चाचणीसाठी नोंदणी केली आहे. ज्यांच्या घरात टीबीची केस आढळून आली आहे, असे लोक क्लिनिकल चाचणीसाठी स्वयंसेवक आहेत. सध्या रोग प्रतिबंधक चाचणी सुरू असून ज्यांना क्षयरोग होण्याचा धोका जास्त आहे अशा लोकांना ते दिले जाऊ शकते. दरम्यान, चाचणी अद्याप सुरू असून, या चाचणीचा पाठपुरावा ङ्गेब्रुवारी २०२४ पर्यंत चालणार आहे. या डेटाचा अहवाल पाहिल्यानंतर या चाचणीबाबत निर्णय घेण्यात येईल.