भारतात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाचा आणखी एक रुग्ण गाझियाबादमध्ये आढळला आहे. या व्यक्तीला दिल्लीतील इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ३० वर गेली आहे. गुरुग्राममधील पेटीएम कंपनीतील एका कर्मचार्याला बुधवारी रात्री कोरोना झाल्याचे दिसून आले होते. त्यानंतर
गाझियाबादमधील या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. ही व्यक्ती २३ फेब्रुवारीला इराणची राजधानी तेहरानमधून मायदेशात दाखल झाली होती.
दरम्यान, कोरोनाचा संसर्ग होण्यापासून वाचण्यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण केली जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारत सरकारकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती भवनने होळीचे कार्यक्रमही रद्द केले आहेत. इटली आणि दक्षिण कोरियातून मायदेशात दाखल होणार्या नागरिकांसाठी दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. दुसरीकडे दिल्ली सरकारने ३१ मार्चपर्यंत सर्व सरकारी आणि खासगी प्राथमिक शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अटारी सीमेवर पाकिस्तानमधून येणार्या ट्रक चालकांची कोरोनाची तपासणी करण्यात येत आहे.
पंतप्रधान मोदींचा
बेल्जियम दौरा रद्द
दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बेल्जियमचा दौरा रद्द झाल्याची माहिती दिली. पंंतप्रधानांचा बेल्जियम दौरा रद्द करण्यात आला असून बेल्जियम दौर्याची पुढील तारीख नंतर जाहीर केली जाईल, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी दिली. भारत आणि युरोपीय संघाच्या आरोग्य विभागाच्या अधिकार्यांनी कोरोना विषाणूबाबत दिलेल्या माहितीनंतरच पंतप्रधान मोदी यांचा बेल्जियम दौरा रद्द करण्याच आल्याचे रवीश कुमार म्हणाले.
कोरोनामुळे जगभरात आतापर्यंत ३,२०० हून अधिक लोकांना मृत्यू झाला आहे. चीनमध्येच कोरोनाने ३ हजार बळी घेतलेत जगभरात कोरोनाचे ९५ हजार रुग्ण आढळून आले आहेत. ८५ देशांमध्ये करोना फोफावला आहे.
राज्यात कोरोनाचा आणखी एक रुग्ण
राज्यात आणखीन एक कोरोना संशयित रुग्ण काल आढळून आला आहे. कोरोना संशयित रुग्ण हा ब्रिटनचा नागरिक असून त्याला गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या खास वॉर्डात ठेवण्यात आला आहे. त्याच्या रक्ताचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. मागील दोन दिवसांत तीन कोरोना संशयित रुग्ण आढळून आले आहेत. बुधवार दि. ४ रोजी दोन कोरोना संशयित रुग्ण आढळून आले होते. त्या दोघांचा रक्त तपासणी अहवाल अद्यापपर्यंत प्राप्त झालेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सरकारचे दुर्लक्ष ः सरदेसाई
कोरोना विषाणूंचा संसर्ग झाल्याचा संशय असलेल्या रुग्णांच्याबाबतीत गोवा सरकारने हलगर्जीपणा चालवलेला आहे. विदेशातून येणार्या प्रवांशाची दोबाळी विमानतळावर तपासणीही केली जात नसल्याचा आरोप काल गोवा फॉरवर्डचे आमदार, माजी मुख्यमंत्री विजय सरदेसाई यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. मात्र, याबाबत आपण आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांना दोष देत नसल्याचे सांगून त्याबाबत विमानतळ प्राधिकरणानेच काय तो खुलासा करावा, असे सरदेसाई म्हणाले.