- डॉ. उदय देशमुख
सह-संस्थापक, समर्थ भारत, गोवा
सोयी-सुविधांना प्राधान्य आणि जीवनाचा वेग यामुळे निमशहरी आणि शहरी लोक फ्रोझन म्हणजेच तयार- ‘रेडी टू कूक’-‘हीट अँड इट’- खाण्याकडे वळत आहेत. काही वर्षांपूर्वीपर्यंत भारतात अशी संकल्पना अकल्पनीय आणि एक परकी कल्पना होती. तथापि, आता हा मुख्य प्रवाहातील खाद्यपदार्थ बनला असून भारतीय खाद्य-बाजारावर वर्चस्व गाजवत आहे.
सोयी-सुविधांना प्राधान्य आणि जीवनाचा वेग यामुळे निमशहरी आणि शहरी लोक फ्रोझन म्हणजेच तयार- ‘रेडी टू कूक’-‘हीट अँड इट’- खाण्याकडे वळत आहेत. काही वर्षांपूर्वीपर्यंत भारतात अशी संकल्पना अकल्पनीय आणि एक परकी कल्पना होती. तथापि, आता हा मुख्य प्रवाहातील खाद्यपदार्थ बनला असून भारतीय खाद्य-बाजारावर वर्चस्व गाजवत आहे.
‘फ्रोझन फूड’ची वाढती लोकप्रियता
एक काळ असा होता जेव्हा फ्रोझन अन्न हे आइस्क्रीम किंवा बहुराष्ट्रीय कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेत पुरवलेल्या काही आयातीत फ्रोझन फळांसारख्या मिष्टान्नांचे समानार्थी होते. परंतु गेल्या काही वर्षांत हे नाटकीयरीत्या बदलले आहे. कारण आम्हां भारतीय ग्राहकांमध्ये त्याची झपाट्याने वाढ आणि लोकप्रियता पाहत आहोत.
विश्लेषण आणि संशोधनानुसार 2020 मध्ये फ्रोझन फूड मार्केट 99 अब्ज रुपये होते आणि 2025 पर्यंत बाजार 225 अब्ज रुपयांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. वाढत्या उत्पन्नासह, वेळेची कमतरता आणि दोन्ही भागीदार काम करत असल्याने ‘रेडी टू कूक’, ‘हीट अँड इट’ खाण्याकडे लोक वळले आहेत. भारतात तुलनेने जरी कमी प्रमाणातच फ्रोझन पदार्थ खाल्ले जात असले तरी त्यांची लोकप्रियता वाढतच आहे. सोयी-सुविधा व जीवनाचा वेग यामुळे निमशहरी आणि शहरी लोकसंख्या त्यांच्या वाढत्या डिस्पोजेबल उत्पन्नासह, वेळेची कमतरता आणि दोन्ही भागीदार काम करत असल्याने ‘रेडी टू कूक’, ‘हीट अँड इट’ खाण्याकडे वळत आहे.
या व्यतिरिक्त, मी पाहतो की या क्षेत्राच्या वाढीस चालना देणारे इतर अनेक घटक आहेत. त्या कारणास्तव, आपण पाहू शकतो की आजच्या समाजात अन्नाचा अपव्यय ही वाढत्या प्रमाणात मोठी समस्या बनत आहे. विशेषत: आरोग्यदायी खाण्याचा आणि शाश्वत पद्धतींचा अवलंब करणाऱ्या ग्राहकांमध्ये हे दिसून येते.
केवळ महानगरांमध्येच नव्हे तर लहान शहरांमध्येही छोट्या कुटुंबांची संस्कृती वाढत आहे. बहुतेक विभक्त कुटुंबांना दोन लोकांसाठी अन्न तयार करणे कठीण जाते आणि त्यामुळे ते ‘रेडी टू कूक’- ‘हीट अँड इट’ फ्रोझन वस्तू मोठ्या प्रमाणात खरेदी करणे अथवा बाहेर खाणे पसंत करतात. ‘रेडी टू कूक’- ‘हीट अँड इट’ पदार्थांच्या वाढीस आणि लोकप्रियतेला हातभार लावणारा आणखी एक घटक म्हणजे त्यांची ऑनलाइन व ऑफलाइन चॅनेलद्वारे सहज उपलब्धता. उत्पादनांचा वापर काही मिनिटांत स्वादिष्ट जेवण बनवण्यासाठी केला जाऊ शकतो. तरुण लोक नवनवीन प्रयोग करत असतात आणि फ्रोझन पर्यायांसह स्वादिष्ट पदार्थ बनवणे सोपे जाते. नोकरीनिमित्त जो वर्ग घरापासून दूर राहतो आणि स्वतःच जगतो, त्यांच्यासाठी ‘रेडी टू कूक’- ‘हीट अँड इट’ जेवण हा एक चांगला पर्याय दिसून येतो.
फ्रोझन- ‘रेडी टू कूक’ आणि ‘हीट अँड इट’ जेवण हा एक पर्याय नव्हे तर चॉईस बनला आहे. कोविड काळात फ्रोझन ‘रेडी टू कूक’, ‘हीट अँड इट’ पदार्थ त्यांच्या सोयी आणि परवडण्यामुळे लोकप्रिय होत राहिले. लोकांनी विक्रेत्यांना वारंवार भेट देण्यापेक्षा अन्न साठवण्याला प्राधान्य दिले. या उत्पादनांच्या लोकप्रियतेचा आणि वाढीचा परिणाम या काळात जाणवला. या क्षेत्रातील प्रख्यात ब्रँड्सव्यतिरिक्त भारतीय ब्रँड्सचीही वाढ झाली आहे आणि ते भारतीयांच्या आवडीनुसार बनवले गेले आहेत. फिंगर फूड, फ्रोझन स्नॅक्स, बटाटा-आधारित उत्पादने, फ्रोझन भाज्या, फ्रोझन मीट, मासे इत्यादी विविध फ्रोझन अन्न उत्पादनांनी बाजारातील परिदृश्य बदलले आहे.
कोविड काळात प्रथमच फ्रोझन, रेडी टू कूक, हीट अँड इट स्नॅक्स, फिंगर फूड, कॉम्बो जेवण आणि मुख्य कोर्सचे पर्याय गोव्यातील शहरी भागातील सर्व सुपरमार्केट आणि हायपरमार्टमध्ये उपलब्ध दिसू लागले. तेथे शाकाहारी आणि मांसाहारी श्रेणी व गोव्यातील सांस्कृतिक प्राधान्ये आणि विविधता असूनही ते वेगाने प्रत्येक घराचा भाग बनत आहेत.
अन्न ताजे ठेवण्यासाठी उत्पादन आणि पॅकेजिंग
अन्न ताजे आणि पौष्टिक ठेवण्यासाठी अन्न पॅकेजिंग आणि उत्पादन सतत विकसित होत आहे. खाद्यपदार्थ पॅक करण्याच्या पद्धतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचे संशोधन अंतर्भूत केल्यामुळे, दीर्घकाळ ताजे राहणारे चवदार आणि आरोग्यदायी पर्याय तयार करणे उद्योगासाठी सोपे होत आहे. यामुळे प्रिझर्व्हेटिव्ह, रंग किंवा इतर ॲडिटिव्हज वापरण्याचा वावही दूर होतो. मला हे वैयक्तिकरीत्या समजते कारण ‘समर्थ भारत’अंतर्गत आम्ही ताजी आणि फ्रोझन फळे, भाजीपाला आणि तयार- रेडी टू कूक, हीट अँड इट अन्नपुरवठा करतो.
आम्ही नवनवीन पाककृतींवर काम करत आहोत, ज्या बदलत्या बाजार परिस्थितीशी सहज जुळवून घेता येतील. सुरक्षित पॅकेजिंग आमचे उत्पादन सर्व पौष्टिक मूल्यांसह सुरक्षित ठेवते. उत्पादन ताजे ठेवण्यासाठी उत्पादक अत्याधुनिक पॅकेजिंग वापरतात, ज्यानुसार उत्पादनाचे आतील पॅक व्हॅक्यूम सील केलेले असते, जेणेकरून फ्रीझर्समध्ये इष्टतम गोठवणाऱ्या तापमानात कोणतेही प्रदूषण होणार नाही. नंतर ते पुन्हा वापरता येण्याजोग्या झिपलॉक पाउचमध्ये पॅक केले जाते जे ग्राहकांना उघडण्यास, थोड्या प्रमाणात वापरण्यास आणि नंतर उर्वरित उत्पादन फ्रीजरमध्ये परत ठेवण्यास मदत करते.
कोल्ड सप्लाय चेन- भारतात एक आव्हान
वर नमूद केलेल्या सर्व घटकांसह असे म्हणता येईल की, फ्रोझन अन्न- रेडी टू कूक, हीट अँड इट बाजारपेठेचा वापर तुलनेने अप्रचलित असला तरी वाढीची क्षमता अफाट आहे.
भारतातील एक आव्हान असलेली शीतसाखळीप्रणाली व्यवस्थित स्थापित झाली की फ्रोझन अन्न दुर्गम भागांसह देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचू शकते. यामुळे किमती घसरतील आणि उपलब्धता सुधारेल. जागतिक बाजारपेठेतही भारतीय फ्रोझन खाद्यपदार्थांची आवड अभूतपूर्व आहे. यामुळे भारतात फ्रोझन खाद्यपदार्थांची मागणी वाढेल. सरकारने उद्योगांना दिलेला पाठिंबा आणि भारतीय खाद्यपदार्थ आणि चवींनी जागतिक सीमा ओलांडल्यामुळे भारतातही निर्यात वाढत आहे.
फूड टेक आणि नावीन्य ही गोव्यातील शेती टिकवून ठेवण्याची गुरुकिल्ली आहे. अनिश्चित हवामान हे बागायतीसाठी आव्हान आहे आणि फूड टेक आणि नावीन्यपूर्णता ही गोव्यातील शेती टिकवून ठेवण्याची गुरुकिल्ली आहे.
एप्रिल-मे महिन्यात गोव्याचा आवडता मानकुराद आंबा बाजारपेठेत दिसणे दुर्मीळ होऊ शकते. अवकाळी पाऊस, रात्रीच्या तापमानात अचानक घट आणि दिवसाची तीव्र उष्णता हे या वर्षी गोव्यात आंब्याचे प्रदर्शन न होण्याचे मुख्य कारण होय आणि असा हवामानाचा ट्रेंड आगामी काळात आणखी कठोर होऊ शकतो. हे केवळ मानकुराद आंब्यासाठीच नाही तर गोव्यातील जवळपास सर्वच फळ व शेतमालासाठी आहे.
निसर्गाच्या या अनिश्चिततेतून शेतकरी कसा टिकून राहतो, आणि तो तग धरू शकेल का? गोवेकरांना पूर्वीप्रमाणे हंगामी फळे आणि इतर उत्पादनांचा आनंद घेता येईल का नाही, या अनिश्चिततेशी आपण कसे जुळवून घेत ही समस्या सोडवू यावर चिंतन करावे लागेल.
तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सहकार्य पद्धतीने अपग्रेड करणे हे येथे महत्त्वाचे आहे. फ्रोझन- रेडी टू कूक, हीट अँड इट हे अन्नाचे भविष्य आहे आणि म्हणून गोव्यातील शेतीपद्धती व प्रक्रिया सुधारणे आवश्यक आहे.
खेड्यातील शेतमालावर स्वच्छता व प्रक्रिया करून पॅक केल्यावर या मूल्यवर्धनाला शहरवासीयांमध्ये जास्त मागणी आहे. ते योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचते आणि शेतमालाला चांगली किंमतही मिळवून देते. गोव्यात अन्नप्रक्रिया पारंपरिकपणे अस्तित्वात आहे. तथापि, बदलत्या काळासाठी अन्न सुरक्षा आणि ग्राहकांच्या मागण्या लक्षात घेऊन अधिक व्यावसायिक, फ्युचर रेडी आणि आरोग्यदायी दृष्टिकोनाची गरज आहे.
अंत्रुज फूड्स हा एक सहकारी अन्न प्रक्रिया ग्रामोद्योग सावई-वेरे गावातील नावीन्यपूर्ण प्रकल्प आहे जो भविष्यातील कल समजून घेण्यास एक योग्य पाऊल आहे. जॅकफ्रूट, अननस, कोकम, आंबा, केळी इत्यादी स्थानिक फळांवर प्रक्रिया/हायजिनिक पॅकिंग, स्वच्छतापूर्ण सेटअप आणि बर्गर, पॅटीस, कँडीज, लोणचे, पापड, चिप्स, चटणी, जाम आणि ज्यूस यांसारखे पदार्थ रेडी टू कूक, रेडी टू इट तयार केले जातात. ज्या शहरी भागात त्यांना मागणी जास्त आहे तेथे विकले जातात.
तरपर ीर्हीीली ही म्हापसा येथील कंपनी शेतकरी/गृहिणी यांना घरच्या घरी ऑयस्टर मशरूम वाढवण्याचे प्रशिक्षण देते. त्यानंतर उत्पादन गोळा करून त्यापासून कुकीज, कँडी, लोणचे, पापड आणि प्रिझर्व्हजसारखे रेडी टू इट पदार्थ केले जातात.
खात्रीशीर अन्न सुरक्षा, गुणवत्ता, अखंड पुरवठा आणि आम्ही तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त देत आहोत असा बीजमंत्र घेऊन एक नवीन ट्रेंड गोव्यातील अन्नप्रकिया उद्योग होऊ शकतो.