>>रियो ऑलिम्पिकसाठी पात्रतेची संधी
जाउना मुर्मू, अश्विनी अकुंजी, अनिल्डा थॉमस आणि एमआर पूवम्मा यांचा समावेश असलेल्या भारताच्या ४४०० रिले संघाने ३.३१.३९ सेकंदाची वेळ देत सॅमोरिन-स्लोव्हाकिया येथे आयोजित स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई केली.
या सुवर्ण पदकामुळे भारताने ४४०० रिले जागतिक रँकिंगमध्ये १५वे स्थान मिळविले असल्याने त्यांना आता रिओ ऑलिम्पिकची दारे उघण्याची शक्यता आहे. कारण रँकिंगमधील अव्वल १६ संघांना रियो ऑलिम्पिकची पात्रता मिळणार आहे. बहामाच्या नसाउ येथे झालेल्या आयएएएफ विश्व रिले स्पर्धेची अंतिम फेरी गाठणार्या आठ संघांनी यापूर्वीच आपली पात्रता मिळवलेली आहे. तर उर्वरित आठ संघांना १ जानेवारी ते ११ जुलै २०१६दरम्यान झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांत केलेल्या कामगिरीच्या आधारे पात्रता मिळणार आहे. भारतीय राष्ट्रीय सघाची सर्वोत्तम कामगिरी २०१५त जिश्ना मॅथ्यू, टिंटु लुका, देबाश्री मुजुमदार आणि पूवम्मा यांनी बीजिंममध्ये विश्व