भारताच्या पिनाक रॉकेट लाँचरची यशस्वी चाचणी

0
4

भारताने गाइडेड पिनाक वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी केली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) ही चाचणी केली. ही सिस्टिम पूर्णपणे देशातच बनवण्यात आली आहे. ही यंत्रणा अवघ्या 44 सेकंदांत 12 रॉकेट डागू शकते, म्हणजेच प्रत्येक 4 सेकंदाला एक रॉकेट. चाचण्यांदरम्यान, त्याची फायर पॉवर, अचूकता आणि एकाच वेळी अनेक लक्ष्यांवर हल्ला करण्याची क्षमता तपासण्यात आली. ही चाचणी तीन वेगवेगळ्या ठिकाणी घेण्यात आली. दोन लाँचर्समधून एकूण 24 रॉकेट डागण्यात आले. हे सर्व रॉकेट त्यांच्या लक्ष्यांवर यशस्वीपणे मारा करण्यात यशस्वी झाले. या यशाबद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओ आणि लष्कराचे अभिनंदन केले. या नवीन प्रणालीमुळे आमचे सैन्य अधिक मजबूत होईल, असे संरक्षणमंत्री म्हणाले.