भारताचे पहिले मि. युनिव्हर्स मनोहर ऐच यांचे निधन

0
85

भारताचे पहिले मि. युनिव्हर्स शरीरसौष्ठवपटू मनोहर ऐच यांचे वयाच्या १०४व्या वर्षी त्यांच्या कोलकात्यातील निवासस्थानी निधन झाले.

गेल्या १०-१५ दिवसांपासून त्यांची प्रकृती अत्यंत खालावली होती आणि त्यांनी काल दु. ३.५० वा. अंतिम श्वास घेतला. त्यांच्यामागे २ मुली आणि २ पुत्र आसा परिवार आहे. अवघी ४ फूट आणि ११ इंच उची लाभलेल्या मनोहर यांनी १९५२साली सर्वात प्रथम भारताला मि. युनिव्हर्स किताब मिळवून दिला होता. त्यापूर्वी १९५१मध्ये त्यांना दुसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते.