शतकवीर शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी पहिल्या यष्टिसाठी केलेल्या १७४ धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारताने आयर्लंडच्या २६० धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करत आयसीसी विश्वचषकातील सलग पाचव्या विजयाची नोंद केली.
टीम इंडियाने आयर्लंडचे आव्हान ३७ व्या षटकात केवळ दोन विकेट्स गमावून गाठले. भारताकडून शिखर धवनने आयर्लंडच्या गोलंदाजांचा यथेच्छ समाचार घेत केवळ ८५ चेंडूत ११ चौकार आणि पाच षटकारांसह सर्वाधिक १०० तर रोहितने ६६ चेंडूत ३ चौकार आणि तेवढ्याच षट्कारासह ६४ धावा ठोकल्या.
सलामीवीरांच्या कामगिरीनंतर विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी अनुक्रमे ४४ आणि ३३ धावांची नाबाद खेळी करून टीम इंडियाचा विश्व चषकातील सलग नववा विजय झळकविला.तत्पूर्वी, नाणेङ्गेक जिंकून प्रथम ङ्गलंदाजीचा निर्णय घेतलेल्या आयर्लंडचा डाव २५९ संपुष्टात आला. आयर्लंडच्या सलामीवरांनी दमदार सुरूवात करून दिली होती. कर्णधार विल्यम पोर्टरङ्गील्ड आणि स्टर्लिंगच्या ८९ धावांच्या भागीदारीने आयर्लंड संघ भारतापुढे दमदार भक्कम आव्हान उभे करणार असे वाटले होते पण भारतीय ङ्गिरकी गोलंदाजीपुढे त्यांनी नांगी टाकली. ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने टीम इंडियाला १४ व्या षटकात पहिले यश देताना स्टर्लिंगला (४२)तंबूत पाठविले. पाठोपाठ सुरेश रैनाच्या गोलंदाजीवर एड जॉयस त्रिङ्गळाचीत झाला. ङ्गिरकी गोलंदाजीवर आयर्लंडच्या ङ्गलंदाजांना संघर्ष करावा लागत असल्याचे पाहून धोनीने अश्विनकडून झटपट आठ षटके टाकून घेतली तर, रोहित शर्माकडूनही तीन षटके गोलंदाजी करून घेतली. एक बाजू संयतपणे लढविलेला कर्णधार विल्यम पोर्टरङ्गील्ड (६७) धावांवर मोहित शर्माच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. ङ्गपॉवर-प्लेफमध्ये मात्र आयर्लंडने दमदार ङ्गलंदाजी करीत दोनशेचा आकडा पार केला. नील ओब्रायनने ७ चौकार आणि ३ षट्कारासह सर्वाधिक ७५ चोपल्या. अश्विनने बलबिर्नीला २४ धावांवर बाद करून संघाला चौथे यश मिळवून दिले. पाठोपाठ मोहम्मद शमीने केव्हिन ओब्रायनला तंबूत धाडले. धाववेग मंदावल्याने अखेरच्या षटकांत आयर्लंडने झटपट धावा करण्याच्या नादात स्वस्तात विकेट्स गमावण्यास सुरुवात केली आणि ३२ धावात ६ गडी गमावले व ४९ व्या षटकात २५९ धावांवर डाव आटोपला. भारतातर्फे मोहम्मद शमीने तीन तर, अश्विनने दोन तर रैना, यादव, जडेजा, मोहित शर्मा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून शुभेच्छा
राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यानी काल आयर्लंडवर ८ गडी राखून विजय मिळवित विश्व चषकात पाचवा विजय नोंदलेल्या टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या.
ब्रावो, वेल डन इंडिया, असा संदेश राष्ट्रपतीनी ‘ट्विटर’द्वारे टीम इंडियाला पाठविला आहे. सलग पाचच्या विजयासाठी शुभेच्छा, विश्व चषकातील आगेकूच अशीच कायम राखा, असे प्रधानमंत्री मोदी यांनी ‘ट्विटर’ वरील संदेश म्हटले आहे. क्रीडामंत्री सोनोवाल यांनीही सामनावीर शिखर धवन तसेच विश्व चषकातील यशस्वी भारतीय कर्णधार धोनी आणि कंपनीला विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.