भाजप सरकार झोपले आहे काय? ः प्रतापसिंह

0
103

राज्यातील नागरिकांना मागील दोन वर्षापासून विविध प्रश्‍नांमुळे त्रास सहन करावा लागत आहे. खाण उद्योग बंद पडला आहे. राज्यात नवीन उद्योगधंदे येत नाहीत. भाजपच्या एका पदाधिकार्‍याच्या आस्थापनामधून कॅटमाईन अमलीपदार्थ हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी कोणतीही कारवाई केली जात नाही, राज्यात भ्रष्टाचाराच्या प्रमाणात वाढ होत आहे. प्रशासन ठप्प झालेले आहे. भाजप सरकार झोपले आहे की झोपेचे सोंग करीत आहे? असा प्रश्‍न माजी मुख्यमंत्री तथा आमदार प्रतापसिंह राणे यांनी उपस्थित केला.