भाजप राज्य कार्यकारी समितीची रविवारी बैठक

0
187

भाजपच्या राज्य कार्यकारी समितीची बैठक येत्या ७ फेब्रुवारीला सकाळी १०.३० ते संध्याकाळी ५.३० यावेळेत गोमंतक मराठा समाज संस्थेच्या सभागृहात घेण्यात येणार आहे. या बैठकीला केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग, भाजपचे गोवा प्रभारी सी. टी. रवी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.

भाजपने संघटनात्मक कार्यावर भर दिला आहे. कोविडमुळे कार्यकारी समितीची बैठक घेणे शक्य झाले नव्हते. भाजपची नूतन कार्यकारी समितीची घोषणा केल्यानंतर प्रथमच बैठक घेतली जात आहे. मागील दोन महिन्यात राज्यातील ४० पैकी ३७ मतदारसंघात प्रशिक्षण शिबिरे घेण्यात आली आहेत. राज्यात नऊ नगरपालिका क्षेत्रात युवा मेळावे घेण्यात आले आहेत. तसेच, मतदारसंघनिहाय महिला मेळावे घेतले जाणार आहेत, असेही तानावडे यांनी सांगितले.

कोविड महामारीच्या काळात आरोग्य व विकास कामांवर भर देण्यात आला आहे. गोवा राज्याचा ६० वा मुक्तीदिन कार्यक्रम साजरा करण्यासाठी ३०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे, असेही तानावडे यांनी सांगितले.